Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत कृष्णा काठावर कडक पोलीस बंदोबस्त : कर्नाळ रस्ता केला बंदपूर पाहण्यासाठी गर्दी करू नये : पोलीस निरीक्षक संजय मोरे

सांगलीत कृष्णा काठावर कडक पोलीस बंदोबस्त : कर्नाळ रस्ता केला बंद
पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये : पोलीस निरीक्षक संजय मोरे

सांगली : खरा पंचनामा

पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शहर पोलीस सतर्क आहेत. कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पूर पाहण्यासाठी आयर्विन पूल, नदी काठावर गर्दी करू नये असे आवाहन सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे.
नदीकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून सर्व बंदोबस्त पॉइंटवर सतर्क आहे. पुराचे पाणी येऊ लागलेल्या सखल भागातील नागरिक छोट्या वाहनातून सामान घरातून काढून घेऊन स्थलांतर करीत आहेत. अशा नागरिकांना पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात आहे. उत्साही तरुणांनी स्टंट अथवा हुल्लडबाजी केल्यास तसेच नागरिकांनी नदी काठावर गर्दी केल्यास कारवाई करण्याचा इशारा निरीक्षक मोरे यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.