Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नरसोबावाडीचे पूर्ण दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली

नरसोबावाडीचे पूर्ण दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली

शिरोळ : खरा पंचनामा

तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसोबावाडीचे दत्त मंदिर पूर्णतः पुराच्या पाण्याखाली गेले आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून संपूर्ण मंदिराला पुराचा वेढा पडला आहे.

देवस्थानकडून सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुका पाण्यात असल्याने श्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे. तेथूनच भाविक दर्शन घेत आहेत. नृसिंहवाडीतील सखल भागात पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना स्थलांतराचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. 

आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.