Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात जीवघेणा हल्ला

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात जीवघेणा हल्ला 

नवी दिल्ली : खरा पंचनामा

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी आठ वाजता एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनता दरबार घेत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यानंतर तिथे गोंधळ उडाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे, पोलिस त्याची चौकशी करत आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेखा गुप्तांना शिवीगाळ करण्यात आली आणि केसांना ओढून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच दगड फेकून मारण्याचाही प्रयत्न केला गेला. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी जनता दरबारादरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

प्राथमिक माहितीनुसार आरोपीने आपले नाव राजेश भाई खिमजी सकारिया असे सांगितले आहे. आरोपी राजकोटचा रहिवासी आहे. तो ४१ वर्षांचा आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याची माहिती गृह मंत्रालयाला दिली आहे.

दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर यांनी असेही सांगितले की, एका व्यक्तीने जनसुनावणीच्या बहाण्याने सीएम गुप्ता यांच्याकडे आला. त्याने प्रथम मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली, नंतर ओरडण्यास सुरुवात केली आणि त्यांना थप्पड मारली. तथापि, दिल्ली भाजप अध्यक्षांनी दिल्ली मुख्यमंत्र्यांना थप्पड मारल्याचा इन्कार केला आहे.

आम आदमी पक्षाने दिल्ली मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते अनुराग धांडा म्हणाले की, दिल्ली पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अशा बाबींवर आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.