नदी काठावर स्टंटबाजी, हुल्लडबाजी केल्यास कडक कारवाई करणार
एपिआय संदीप शिंदे यांचा इशारा : मिरजेतील नदीकाठाची केली पाहणी
मिरज : खरा पंचनामा
वारणेतून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कृष्णा नदी काठावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. काही उत्साही तरुण या परिसरात स्टंट, हुल्लडबाजी करत असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करू असा इशारा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय संदीप शिंदे यांनी दिला आहे.
पाणी पातळी वाढत असल्यामुळे श्री. शिंदे यांनी मिरजेतील घाट परिसराची पाहणी केली. त्यावेळी या पूर परिस्थिती अनुषंगाने मिरज येथील कृष्णा घाट परिसरामध्ये पेट्रोलिंग व इतर आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने योग्य पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच नागरिकांना घाटापासून दूर राहणे, तसेच स्टंटबाजी, हुल्लडबाजी न करणे बाबत सूचित करण्यात आलेले आहे.
महापालिका आयुक्त, उपायुक्त यांच्या समवेत पाहणी करून 100 जनावरांचे स्थलांतर करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. गरज पडल्यास प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांच्या स्थलांतरासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून योग्य तो बंदोबस्त पुरवण्यात येईल. पूर स्थितीवर पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.