टँकरमधून पुष्पा स्टाईलने दारुची तस्करी, ५६ लाखाचा साठा जप्त
धुळे : खरा पंचनामा
धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेनं खाद्य तेलाच्या टँकरमधून होणाऱ्या दारु तस्करीचा भांडाफोड केला आहे. 'पुष्पा' चित्रपटाप्रमाणे खाद्यतेलाच्या टँकरमधून दारू तस्करी सुरू होती.
या कारवाईत ५५ लाख ९६ हजार २०० रुपयांचा ४०० खोके मद्यसाठा जप्त केला असून या कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू तस्करीला मोठा धक्का बसला आहे.
याबाबत असे की हरियाणाकडून गुजरातच्या दिशेने जाणारा २२ चाकी टैंकर (जी.जे. १२, बी.व्हि.५०१५) मधून चोरट्या पद्धतीने मद्याची वाहतूक केली जाते आहे, अशी माहिती धुळे एलसीबी व नरडाणा पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या पथकाने मुंबई-आग्रा रोडवरील नरडाणाजवळ हा टँकर अडवला. चालक मोहनलाल पुरखाराम जाट (वय २५, रा. बरेवालातला, बाडमेर, रा. राजस्थान) याला विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे या टँकरची तपासणी केल्यावर त्यात सहा चोर कप्पे मिळून आले. त्यापैकी चार कप्पयांमध्ये ४०० बॉक्स मिळून आले. खाद्यतेलाचे नाव सांगून ही वाहतूक केली जात होती. कारवाईत ऑल सिझन रेअर कलेक्शनचे तीन हजार ५४० बाटल्या, रॉयल चॅलेंजच्या ८४०, रॉयल स्टॅक क्लासिक व्हिस्कीच्या ४२० अशा एकूण चार हजार ८०० मोठ्या आकारातील बाटल्या जप्त केले आहे. कारवाईत ५५ लाख ९६ हजार २०० मद्दसाठा तर ४५ लाखांचा मिळून आला.
पोलिसांनी ही सर्व दारू आणि टँकर जप्त केला असून ही दारू नेमकी कुठे नेली जात होती, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.