HSRP नंबरप्लेट बदलण्याच्या प्रक्रियेला चौथ्यांदा मुदतवाढ
पुणे : खरा पंचनामा
वाहनांना 'उच्च सुरक्षा नोंदणी पाटी' (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) लावण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट निश्चित केली होती. मात्र, वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. किचकट प्रक्रिया, पुरेशा माहितीचा अभाव आणि विक्रेत्यांकडून ज्यादा पैशांची मागणी यामुळे ही योजना कासवगतीने सुरू आहे. परिणामी, राज्य परिवहन विभागाला आता पर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ द्यावी लागली आहे. तरीदेखील अपेक्षित वाहनांची संख्या गाठता आलेली नाही.
पुणे शहरात सुमारे २५ लाख वाहनांना 'उच्च सुरक्षा नोंदणी पाटी' बसविणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत फक्त साडेपाच लाख वाहनांनाच या पाट्या बसविल्या गेल्या आहेत. वाहनधारकांनी नवीन नंबरप्लेट बसवून घ्यावे याकरिता परिवहन विभागाने विविध स्तरावर प्रयत्न केले. यात १ हजार रुपये दंडाची अट व नवीन नंबरप्लेट नसेल तर संबंधित वाहनांची आरटीओतील कामावर निर्बंध आणण्याचा देखील निर्णय झाला, तरी देखील वाहनधारकांचा प्रतिसाद लाभला नाही. परिणामी, विभागाला पुन्हा सुमारे एका महिन्याची मुदतवाढ द्यावी लागत आहे. या संदर्भात परिवहन विभाग लवकरच अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढणार आहे.
सध्या अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) असल्याचे पाहिला मिळत आहे. तर काही वाहनांवर अद्यापही अशा नंबर प्लेट दिसत नाही. परिवहन विभागाने एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत 15 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.
15 ऑगस्टनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट 1 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांनी 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली आहे, परंतु फिटमेंट त्या नंतरच्या तारखेला आहे, त्यांना दंड लागणार नाही. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना (दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि खासगी) एचएसआरपी बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम, लेसर-एच्ड युनिक आयडी आणि नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक असलेल्या टॅम्पर-प्रूफ प्लेट्सचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.