वाहतूक नियंत्रणाऐवजी थांबवत होते वाहने ; वाहतूक पोलिसांवरच कारवाई
पुणे : खरा पंचनामा
टिळक रस्त्यावरील वेगवेगळ्या चौकात वाहतूक नियमनाची जबाबदारी असताना पूरम चौकात घोळक्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.
पोलीस हवालदार संतोष यादव, शिपाई बालाजी पवार, मोनिका करंजकर-लांघे अशी त्यांची नावे आहेत. तिघे खडक वाहतूक विभागात कार्यरत आहेत. १५ मे रोजी संतोष यादव यांना स. प. महाविद्यालय चौक, बालाजी पवार यांना हिराबाग आणि मोनिका करंजकर यांना भावे चौकात वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपविली होती.
त्यानंतरही तिघे पूरम चौकात आले. तेथे वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहने थांबवताना आढळले. वाहतूक कोंडी टाळण्याच्या सूचना दिल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आल्याने त्यांना उपायुक्त हिंमत जाधव यांनी निलंबित केले होते. कर्तव्यातील कसुरीबद्दल पाच हजार दंडाच्या शिक्षेबाबत कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यावरील त्यांचा खुलासा अंशतः समाधानकारक आढळला. त्यामुळे दीड हजार दंडाची शिक्षा जाधव यांनी सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.