सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार
सांगली : खरा पंचनामा
सांगलीचे लोकप्रिय आमदार श्री. सुधीर दादा गाडगीळ यांची शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी निवड केली आहे. या निवडीबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव विनोद पाटोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार गाडगीळ यांचा गौरव केला. यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष तथा भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, प्राचार्य एम. एस. राजपूत, भारत दुधाळ व प्रशांत अवधूत उपस्थित होते.
सत्कार निमित्ताने झालेल्या चर्चेत शिक्षण संस्थांसमोरील विविध अडचणी पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर दादांसमोर मांडल्या. यावर प्रतिसाद देताना मा. सुधीर दादांनी शासन दरबारी योग्य ते प्रयत्न करून त्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे आश्वासन दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.