Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनोज जरांगेना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी

मनोज जरांगेना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी

मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे.

मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत.

असं असताना मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही अटी-शर्तीसह त्यांना येथे आंदोलन करता येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.