Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच..'

'घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच..'

अहिल्यानगर : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी मराठा आंदोलकांची बाजू मांडत घटनेत बदल करण्याचा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वात मोठे आंदोलन छेडले आहे.

सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता या मैदानात शरद पवारदेखील उतरले आहेत. त्यांनी यासंदर्भात बोलताना महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.ॉ

72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. अहिल्यानगर येथे बोलताना शरत पवार यांनी मराठ आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गाने जावे लागेल असा एक विचार आहे. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याचा वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. विकासाच्या नावाखाली शेतीच्या जमिनी कमी होत आहेत. तर शेतीवर अवलंबून घटक वाढत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींचा विचार करून शेती केली पाहिजे. शेतीत AI चा वापर करायला हवा. रयत शिक्षण संस्थेने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना जनतेने देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.