अमित शाह - एकनाथ शिंदेंची बैठक, बंद दाराआड तासभर खलबतं
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून त्यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.
आज मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केले. यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागले. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. एकीकडे मराठा समाज मुंबईत आक्रमक झालेला असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजकीय घडामोडींसोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा केली.
अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान राज्यातील आंदोलनाची सद्यस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त आणि आंदोलकांच्या मागण्यावर यावर चर्चा झाली. त्यासोबतच अमित शाह यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. साधारण तासभर सुरु असलेल्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध पर्याय काय यावर विचारमंथन करण्यात आले. सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवाद आणि पुढे काय करायचे, याबद्दल अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बोलणं झाल्याची माहिती मिळत आहे.
अमित शाह दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अमित शाहांच्या हस्ते वर्षावरील बाप्पााचीही आरतीही करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेतेमंडळीही उपस्थित होते. आता यानंतर अमित शाह हे लालबागचा राजा या मंडळाला भेट देणार आहेत. त्यासोबच अमित शाह मुंबईतील इतर गणपतींचेही दर्शन घेणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.