ट्रॅफिक पोलिसासाठी रिक्षावाल्याची तोडपाणी
नाशिक : खरा पंचनामा
शहरातील वाहतूक पोलिसांकडून चक्क रिक्षा चालकामार्फत सामान्य माणसांकडून वसूली केली जात आहे. नाशिक - पुणे महामार्गावर धुळे जिल्हयातील वाहनचालकाकडून सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे थेट एक रिक्षावाला तोडपाणी करत शंभरच्या पाच नोटा त्या वाहनचालकाकडून घेतांना दिसतोय. या व्हायरल व्हिडिओमुळे नाशिक पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित असून शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील एका चारचाकी वाहनाच्या (MH18) चालकाने सीटबेल्ट लावलेले नव्हते. त्यामुळे आंबेडकरनगर जवळ त्यास वाहतूक पोलिसांनी थांबवून त्याला दंडात्मक कारवाईची भीती दाखवली.
यावेळी चक्क एका रिक्षा चालवणाऱ्या महाशयाने मध्यस्थी केली आणि पोलीसदादा हळुवारपणे तेथून निघून गेले. मग संपूर्ण तोडपाणी रिक्षावाल्या पठ्ठ्याने हाताळून शंभर दोनशे रुपयांत काय येत...? दारूचे भाव किती वाढले... वगैरे प्रकारचा संवाद साधून पाचशे रुपये द्यावे लागतील असे सांगून मनधरणी केली. मग त्या चालकाने शंभरच्या पाच नोटा त्या रिक्षाचलकाच्या हातात दिल्या आणि त्याने नंतर त्याने पोलिसाला तेथे बोलावून घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.