या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या पाच दिवसातील मध्यम ते जोरदार पावसाच्या हजेरीनंतर, परवा गुरुवार २१ ऑगस्ट सकाळ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. शुक्रवार २२ ऑगस्टला तर पावसाचा जोर अधिकच ओसरेल.
मात्र, मंगळवार ते गुरुवार २६ ते २८ ऑगस्ट (ऋषींपंचमी ते हरतालिका) दरम्यान, नाशिक छ.सं. नगर जालना मुंबई ठाणे पालघरसह विदर्भ खान्देशातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता शक्यता जाणवते. ही शक्यता रविवार २४ ऑगस्ट दरम्यान, बंगालच्या उपसागरात एम.जे.ओ.च्या प्रवेशामुळे, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती व वायव्य दिशेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे जाणवते.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील उगम पावणाऱ्या नद्यांबरोबरच विदर्भ खान्देशांतील नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरण जलसाठ्याच्या टक्केवारीच्या वाढीतील सातत्य पुढील आठवड्यातही टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.