'...म्हणजे मी दादागिरी करतो का?'
पुणे : खरा पंचनामा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले. या वेळी भाषण करताना अनेक नेत्यांनी मिश्किल टोलेबाजीही केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यातील या खास कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'पुण्यात दोन दादा आहेत. एक दादा म्हणजे अजित दादा आणि दुसरे म्हणजे चंद्रकांत दादा. पुण्यातील दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत. काही लोक दादागिरी करत नाहीत परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसते' असं विधान केलं आहे.
यानंतर भाषण करताना अजित पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. चंद्रकांतदादा दादागिरी करत नाहीत. म्हणजे मी दादागिरी करतो का? असा सवाल अजित पवारांनी फडणवीसांना केला. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला. तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी चंद्रकांत दादांना लोक अजूनही पुणेकर मानत नाहीत असंही अजित पवारांनी म्हटलं.
नितीन गडकरींचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार आज नितीन गडकरी यांना मिळत आहे. नितीन गडकरींनी अनेक प्रयोग केले अनेक प्रयोग अंगावर आले अनेकदा कर्जबाजारी झाले पण ते कधीच निराश झाले नाहीत. कितीही कठीण प्रसंग जरी आला तरी त्या प्रसंगावर मात करण्यासाठी धैयर्याने सामोरे जायचं हा त्यांच्यातील महत्त्वाचा गुण आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.