मंत्र्यांवर छापा टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
चेन्नई : खरा पंचनामा
ईडीच्या ज्या अधिकाऱ्यांनी आमदारपुत्र रहात असलेल्या विद्यार्थी हॉस्टेलवर छापा टाकला त्यांच्यावर चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने तामिळनाडु सरकारमधील ग्रामीण विकास मंत्री आय पेरियासामी आणि त्यांचा मुलगा आमदार आयपी सेंथिल कुमार यांच्या मालमत्तांवर धाड टाकली होती. आमदार पिता पुत्रावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणीच ईडीने छापे टाकले होते.
ईडीने एकाच वेळी तीन ठिकाणी छापा टाकला होता. यात मंत्र्यांचे डिंडीगुलमधील निवासस्थान, मुलाच्या पलानीतील निवासस्थान आणि डिंडीगुलमधील शिवाजीनगर इथं राहणाऱ्या इंद्राणी या मुलीच्या घराचाही समावेश होता. छापा टाकण्याआधी अर्धसैनिक दलांच्या पथकांचा तिन्ही ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला होता. यानंतरच ईडीच्या पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली होती.
पेरियासामी आणि त्यांचे कुटुंबिय ज्या प्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे ते प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. यावर १८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तामिळनाडुच्या सत्ताधारी पक्षाने पेरियासामी यांच्या कुटुंबाविरोधात होत असलेली चौकशी पक्षाने पेरियासामी यांच्या कुटुंबाविरोधात होत असलेली चौकशी ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वोट चोरी मोहिमेवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केलाय. डीएमके प्रवक्त्यांनी म्हटलं की, पार्टी ईडीला किंवा मोदींना घाबरणार नाही.
डीएमकेने निवेदन जारी करताना म्हटलं की, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर निवडणुकीचं एक साधन म्हणून करत आहे. सातत्याने विरोधी पक्षांवर मनी लाँड्रिंगचे आरोप केला जातोय. निवडणूक आयोगाचा वापर करून निवडणुकीत हेराफेरी केल्याच्या प्रकरणात भाजपचा खोटा चेहरा उघडा पडलाय. वोट चोरीवरून लक्ष हटवण्यासाठीच आता ईडीला हाताशी धरून छापे टाकले जातायत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.