विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा कारवाईचा डबल धमाका!
सांगलीतील खानापूरच्या नितीन जाधव टोळीतील 10 जणांसह अकलूजमधील बनपट्टे, काळे टोळीतील 13 जणांवर मोकाची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मोका कारवाईचा डबल धमाका केला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नितीन जाधव याच्यासह टोळीतील दहाजणांवर मोकाअंतर्गत कारवाई केली. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील लक्ष्मण बनपट्टे व ज्ञानेश्वर काळे या टोळी प्रमुखांसह 13 जणांवर मोकाची कारवाई करून कोल्हापूर परीक्षेत्रातील गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कार्वे येथील राहुल गणपती जाधव याचा दि. 15 जानेवारी रोजी खून केला होता. याप्रकरणी नितीन पांडुरंग जाधव, रा. कार्वे, ता. खानापुर (परांगदा), प्रफुल्ल विनोद कांबळे (वय २५, रा. कार्वे, ता. खानापुर), शंकर ऊर्फ दिपक पांडुरंग जाधव (वय ३७, रा. कार्वे, ता. खानापुर), रोहन रघुनाथ जाधव (वय २८, रा. कार्वे, ता. खानापुर), गजानन गोपीनाथ शिंदे (वय ४६, रा. मंगरुळ (चि), ता. खानापुर), संतोष मारुती हजारे (वय ३७, रा. कार्वे, ता. खानापुर), अमृतराज शहाजी माळी (वय ४६, रा. कार्वे, ता. खानापुर), नैन ऊर्फ नयन रंगलाल धामी (वय २७, रा. कार्वे, मुळ पत्ता मंगलशेड बस्ती, धनगडी, नेपाळ), माणिक संभाजी परीट (वय ३८, रा. मंगरुळ (चि), ता. खानापुर, जि. सांगली मुळ गाव ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), प्रतिक ऊर्फ बाबु श्रीकांत मोरे (वय ३३, मुळ राहणार माळभाग, बांबवडे, ता. शिराळा) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सांगली पोलिसांनी मंजुरीसाठी महानिरीक्षक फुलारी यांच्याकडे पाठवला होता. महानिरीक्षक फुलारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील लक्ष्मण बनपट्टे, ज्ञानेश्वर काळे या टोळी प्रमुखांसह त्यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंजुरीसाठी पाठवला होता. यामध्ये लक्ष्मण बाबाजी बनपट्टे (रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस), बाजीराव हणंमत सरगर रा. खुडुस, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शंकर अशोक काळे, रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस), ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे, राजु ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दत्ता चौगुले, अतुल दत्तात्रय काळे, आकाश रमेश धोत्रे, बाळु भारत मदने, रोहीत मारूती काळे, सलीम अब्दुल तांबोळी, मनोज अशोक काळे, किशोर राजेंद्र नवगन, सर्व रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस) या गुन्हेगारांचा समावेश आहे. महानिरीक्षक फुलारी यांनी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाईसाठी मंजुरी दिली आहे.
सण आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईचा दणका देण्याचा इशारा या कारवाईतून महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे. गणेशोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी इस्लामपूर तसेच वडगाव मावळ येथील टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर नजर ठेवून या टोळ्या कायमच्या नष्ट करण्यात येतील. गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.