".. तर भीमा-कोरेगावचा इतिहास पुन्हा घडेल"
लक्ष्मण हाकेंच्या एससी आरक्षणाच्या विधानावरुन राज्यभरात संताप
मुंबई : खरा पंचनामा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय जारी केला. त्याविरोधात लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्हा आणि परिसरात 'आरक्षण बचाव' सभांचा धडाका लावला आहे. त्यातच त्यांची टोकाची आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी विधानं येत असल्याने संपात व्यक्त होतोय.
लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणावरुन एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, बलुत्या-आलुत्यामधला नाभिक बांधव, धोबी बांधव यांना एससी प्रवर्गातलं आरक्षण मिळावं. कारण देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते एससीमध्ये येतात. या सगळ्या गोष्टी एससी, एसटीमध्ये कोण देणार असेल, मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे. पण हे आरक्षण मिळण्याअगोदर ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त करण्याची भाषा कोण करत असेल तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके गावगाड्यातल्या आठरा पगड जातीच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल.
लक्ष्मण हाकेंच्या विधानानंतर दलित नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दीपक केदार यांनीतर डोळे काढण्याची भाषा केली आहे. ते म्हणाले की, नाभिक आणि धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्ष्मण हाकेंना आमचा इशारा आहे की, आमच्या नादी लागू नका. दोन जिल्ह्यात एका समाजाच्या बळावर फिरला म्हणजे काय देशाचा, राष्ट्राचा नेता झाला का? महाराष्ट्रात एससी आरक्षणाकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळेसुद्धा काढू, लक्षात ठेव.
केदार पुढे म्हणाले, दंगल होत नाही म्हणून एससी समाजाविषयी विधानं केली जात आहेत? कुणाची सुपारी उचलून आणि तळी उचलून हे भाषणं करतायत? मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे की, यांना रोखा. यांना पोलिस संरक्षण दिलंय म्हणून यांची जीभचुरुचुरु चालायला लागली. या माणसावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कारवाई करा.
दुसरे दलित नेते सचिन खरात यांनीही हाकेंच्या विधानाचा समाचार घेतला. अशा मागण्या करुन दलित समाजाला डिवचण्याचा प्रयत्न आहे. समाजाचा काय इतिहास आहे, हेसुद्धा जाणून घ्या. आम्ही आमचा इतिहास विसरत नाही. नाहीतर नक्कीच भीमा-कोरेगावचा इतिहास पुन्हा नक्की घडेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.