Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी जिल्ह्यात 10 गुन्हे दाखलसायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांची माहिती

सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी जिल्ह्यात 10 गुन्हे दाखल
सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांची माहिती

सांगली : खरा पंचनामा

सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या सोशल मिडीया मॉनेटरिंग सेल मार्फत सोशल मिडीयावरील ८२ आक्षेपार्ह पोस्ट शोधून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर सायबर पोलीस ठाण्याचा 24 तास वॉच असून यापुढेही ही कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांनी दिली.

बोबडे म्हणाल्या, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक श्रीमती कल्पना बारवरकर यांच्या आदेशानुसार सांगली सायबर पोलीस ठाणे येथे सोशल मिडीया मॉनेटरींग सेल स्थापन करण्यात आलेला आहे.

त्याअनुषंगाने सांगली सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी सोशल मिडीया मॉनेटरींग सेल मार्फत २४ तास सोशल मिडीयावरील वेगवेगळया आक्षेपार्ह पोस्ट शोधून, सदर आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांवर जिल्हयातील संबंधित पोलीस ठाणे मार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशा आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांवर जिल्हयातील वेगवेगळया पोलीस ठाणेस भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच इतर आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही बोबडे यांनी सांगितले.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, सतिश आलदर, करण परदेशी, विवेक साळुंखे, अजय पाटील, अभिजित पाटील, विजय पाटणकर, इम्रान महालकरी, शांतव्वा कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.