Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलंबहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं
बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर

मुंबई : खरा पंचनामा

आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं आहे. त्याचदरम्यान, मुंबईच्या लालबागचा राजा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं. या अपघातात 2 वर्षांची चंद्रा वजणदार हिचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ 11 वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीनं गाडी त्यांच्या अंगावर घातली आणि कोणतीही मदत न करता तो घटनास्थळावरुन पसार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे अंदाजे चारच्या सुमारास घडली. ही दोन्ही मुलं रस्त्याच्या कडेला झोपलेली होती. भरधाव येणाऱ्या वाहनाचालकानं थेट या मुलांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर तिथे मदत न करता त्या वाहनचालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची तयारी सुरु असल्यानं लोकांची मोठी गर्दी तिथे होती. अनेकांनी पुढे येत या दोन चिमुकल्यांना केईएम रुग्णालयाक दाखल केलं. सध्या मुलावर उपचार सुरु आहेत. पोलिस या अपघाताप्रकरणी अधिकचा तपास करताना दिसत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.