Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक : तीन गुन्हे उघड 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई

दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक : तीन गुन्हे उघड 
1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील दुधगाव येथून दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दूधगावसह सांगली शहरातील दोन असे तीन गुन्हे उघडकीस आणून 1.20 लाखांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी दिली.

अमिर हुसेन शेख (वय २२, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुधगाव येथील प्रकाश आडमुठे यांची दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना निरीक्षक चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. शाखेतील मेघराज रुपनर, आकाश ऐवळे यांना एक तरुण धामणी येथील एका कॉलेजजवळ चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यावर त्याने ती दुधगाव येथून चोरल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यावर त्याने सांगलीतील संजयनगर परिसरातून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, मेघराज रुपनर, अभिजीत पाटील, बंडू पवार, आकाश ऐवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.