Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या प्रभाग क्र. 15 मध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धारभाजप जैन प्रकोष्ट उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प

सांगलीच्या प्रभाग क्र. 15 मध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार
भाजप जैन प्रकोष्ट उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प

सांगली : खरा पंचनामा

सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गणेश नगर येथील रावसाहेब पाटील यांच्या स्वदेशी व्हिला निवासस्थानी पार पडली. या बैठकीत येऊ घातलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 15 मधील भाजप उमेदवार निवडून आणण्याचा एकमुखी संकल्प करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही यावेळी दिली.

बैठकीत भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभाग क्र. 15 साठी लवकरच एक व्यापक बैठक आयोजित करून त्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, श्रीमती जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, समित कदम, पृथ्वीराज पवार, नितीन शिंदे, दिनकर पाटील इतर मान्यवरांना निमंत्रित करणार असल्याचे सांगितले

यावेळी कार्यकर्त्यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस अजय लोखंडे, दिलीप कांबळे, लाला देशमुख, पापा बागवान, प्रमोद कुदळे, सलीम पन्हाळकर, गजानन नलावडे, प्रमोद शेटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.