Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

25 हजारांच्या लाचप्रकरणी मंडल अधिकारी, कोतवालाला रंगेहात अटकगुंठेवारी नियमीतीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी घेतले पैसे : सांगली एसीबीची कवठेमहांकाळमध्ये कारवाई

25 हजारांच्या लाचप्रकरणी मंडल अधिकारी, कोतवालाला रंगेहात अटक
गुंठेवारी नियमीतीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी घेतले पैसे : सांगली एसीबीची कवठेमहांकाळमध्ये कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

गुंठेवारी नियमितिकरणाचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी मंडल अधिकाऱ्यासाठी 25 हजारांची लाच घेताना कोतवालाला रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी सायंकाळी कवठेमहांकाळ येथे ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांनी दिली.

मंडल अधिकारी मारुती विलास खोत, (वय ४८, रा. विठुरायाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ), कोतवाल (महसूल सहायक) संजय किसन हारगे (वय ४५, रा. विठुरायाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचे आईने व त्यांचे शेजारील इतर लोकांनी खरेदी केलेल्या जुने गुंठेवारी जमीनीचे नियमीतीकरण करण्यासाठी तहसिलदारांकडे दिलेल्या अर्जाची चौकशी, पंचनामा व जाब जबाब नोंद करुन अभिप्राय देवून तहसिलदारांना त्रुटीवर आलेला गुंठेवारी नियमीतीकरण प्रस्ताव सादर करण्यासाठी मंडल अधिकारी मारुती खोत व महसुल सेवक (कोतवाल) संजय हारगे यांनी तक्रारदार यांचेकडे एका प्रस्तावाचे ७ हजार रुपये प्रमाणे एकूण पाच प्रस्तावांचे ३५ हजार रुपये असा 'प्रोटोकॉल' करावा लागेल असे म्हणून ३५ हजार रुपये लाचेची मागणी केलेबाबतचा अर्ज तक्रारदार यांनी दिला होता.

तक्रारदार यांनी दिले लाच मागणी तक्रारी अर्जाचे अनुषंगाने सोमवारी मंडळ अधिकारी कार्यालय कवठेमहांकाळ येथे पडताळणी केल्यावर मारुती खोत यांचेकरीता तक्रारदार यांचेकडे प्रथमतः एकुण ३५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तंडजोडी अंती २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर दि. ०८.०९.२०२५ रोजीचे सापळा कारवाई वेळी यातील आलोसे संजय हारगे यांनी तक्रारदार यांचेकडून मंडळ अधिकारी कार्यालय कवठेमहांकाळ येथे २५ हजार रूपये लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, सीमा माने, विणा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.