Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्पेशल 26 मधील आणखी दोघांना अटक

स्पेशल 26 मधील आणखी दोघांना अटक 

सांगली : खरा पंचनामा 

कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी तोतया आयकर अधिकारी बनून छापा टाकून 16 लाखांची रोकड आणि 1,410 ग्रॅम सोने लंपास करणाऱ्या स्पेशल 26 टोळीतील महिलेसह तिघांना काल अटक करण्यात आली आहे. या टोळीतील आणखी दोघे आज शुक्रवारी स्वतःहून सांगली पोलिसांत हजर झाले असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

अक्षय सुरेश लोहार (वय ३०, रा. बुगटे अलुर ता. हुक्केरी जि. बेळगाव), शकील गौस पटेल (वय ४४, रा. गडहिंग्लज जि कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील जयसिंगपूर येथील मास्तरमाईंड महेश शिंदे आणि रुकडी येथील आदित्य मोरे याचा शोध सुरु आहे. रविवार दि. १४ रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास कवठेमहांकाळ येथे डॉ. म्हेत्रे यांच्या घरी अनोळखी ३ पुरुष व १ महिला यांनी इनकम टॅक्स ऑफीस, मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करुन त्यांच्याकडील १,४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे व १५.६० लाखांची रोकड फसवणूक करुन घेऊन गेल्याने त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  गुन्हा गंभीर असल्याने कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना देवून गुन्हयाबाबत सविस्तर माहिती घेऊन वेगवेगळी पथके तयार करुन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दिक्षा भोसले,  पार्थ मोहिते, दीपक मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज शुक्रवारी अक्षय लोहार, शकील पटेल हे पोलिसांच्या भीतीने स्वतःहून पोलिसांत हजर झाले. काल तीन संशयितांकडून १,४१० ग्रॅम वजनाचे दागिने, बिस्किटे तसेच १५.०५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.