Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इस्लामपूर येथील खूनप्रकरणी दोघांना अटक सांगली एलसीबीची कारवाई

इस्लामपूर येथील खूनप्रकरणी दोघांना अटक 
सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

इस्लामपूर येथे शेखर विशाल उर्फ गऱ्या काळे याच्या खुनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

दैवत बिरज्या पवार (वय ३५), पवन बिरज्या पवार (वय २५, दोघेही रा. साखराळे ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी जयंत ट्रेडिंग समोर इस्लामपुर येथे विशाल ऊर्फ गऱ्या काळे याचा दैवत बिरज्या पवार, पवन बिरज्या पवार यांनी त्यास पाठीत, मांडीवर व हातावर भोकसून गंभीर जखमा करून त्याचा खुन केला होता. याबाबत इस्लामपुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या दोघांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते.

पथकातील उदय माळी, अरुण पाटील यांना हे दोघे पुणे रेल्वे स्थानक येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी पूर्वीच्या वादाच्या रागातून खून केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, उदय माळी, अरुण पाटील, संदीप गुरव, अतुल माने, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, संदीप पाटील, सागर लवटे, ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सुरज थोरात, सुमित सुर्यवंशी, अभिजीत माळकर, संकेत कानडे, गशेण शिदे, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.