Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात महिला राज34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात महिला राज
34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर

मुंबई : खरा पंचनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे.

रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड या ठिकाणी महिला मागस प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे.

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण
1. ठाणे - सर्वसाधारण (महिला)
2. पालघर - अनुसुसूचित जमाती
3. रायगड- सर्वसाधारण
4. रत्नागिरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
5. सिंधुदुर्ग - सर्वसाधारण
6. नाशिक - सर्वसाधारण
7. धुळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
8. नंदूरबार-अनुसूचित जमाती
9. जळगांव - सर्वसाधारण
10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
11. पुणे - सर्वसाधारण
12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
13. सांगली - सर्वसाधारण (महिला)
14. सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
16. छत्रपती संभाजीनगर- सर्वसाधारण
17. जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
18. बीड - अनुसूचित जाती (महिला)
19. हिंगोली - अनुसूचित जाती
20. नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग
21. धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
22. लातूर - सर्वसाधारण (महिला)
23. अमरावती - सर्वसाधारण (महिला)
24. अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
25. परभणी - अनुसूचित जाती
26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
27. बुलढाणा - सर्वसाधारण
28. यवतमाळ सर्वसाधारण
29. नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
30. वर्धा- अनुसूचित जाती
31. भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग
32. गोंदिया - सर्वसाधारण (महिला)
33. चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)
34. गडचिरोली - सर्वसाधारण (महिला)

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राजकीय पक्षांसह आता निवडणूक आयोगानेही तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.