नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले
काठमांडू : खरा पंचनामा
नेपाळमधील हिंसाचार अजूनही सुरुच आहे. सरकारविरोधी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक लुटमार करत आहेत. गुरुवारी काठमांडूजवळ काही लुटारुंनी भारतीय प्रवाशांच्या बसवर हल्ला केला आणि सामान लुटले. या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमीही झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमधील बहुतेक लोक आंध्र प्रदेशचे होते. ते काठमांडूमध्ये पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन भारतात परतत होते. बस मात्र उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.
लुटारुंनी आधी बसवर दगडफेक केली आणि नंतर प्रवाशांचे मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्यास सुरुवात केली. बसमधील किमान ८ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळी लष्कराच्या जवानांनी प्रवाशांना मदत केली. त्यानंतर, भारतीय दूतावासांना माहिती देण्यात आली. सर्व प्रवाशांना काठमांडूहून विमानाने दिल्लीला आणण्यात आले. हल्ला झाला तेव्हा त्यांची बस उत्तर प्रदेशच्या महाराजगंजजवळील सोनौली सीमेवर पोहोचली होती, असे बस चालकाने सांगितले.
चालकाने सांगितले की की लुटारुंनी बसची एकही काच सोडली नाही. नेपाळमधील बिघडत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही राज्यांमध्ये, नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये बरीच खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान भारतात अडकलेल्या नेपाळी नागरिकांना पडताळणीनंतर परत पाठवले जात आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचेही हळूहळू परतणे सुरू आहे. काठमांडूमधील भारतीय दूतावासाने त्यांच्या परतीची व्यवस्था केली आहे.
नेपाळच्या तुरुंगातून पळून जाऊन भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे ६० संशयित नेपाळी कैद्यांना भारत-नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दल (SSB) च्या सतर्क सैनिकांनी पकडले.
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील भारत-नेपाळ सीमेवर SSB जवानांनी या संशयित नेपाळी कैद्यांना पकडले. भारत-नेपाळ सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली SSB ही परिस्थिती पाहता हाय अलर्टवर आहे आणि त्यांची गुप्तचर शाखा देखील सतर्क आहे आणि नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक संशयितावर लक्ष ठेवून आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.