दारुच्या नशेत तरुणांनी आर्मीच्या दोघा हवालदारांना केली मारहाण, पोलिसांशी धक्काबुक्की, 5 जणांना अटक
पुणे : खरा पंचनामा
हवाई दलातील ब्रिगेडियर यांना एअरपोर्ट वर सोडून परत जाणाऱ्या आर्मीच्या पोलिसांनी रस्ता द्यावा, म्हणून व्हॉर्न वाजविल्याने त्यांना अडवून दारुने तर्र झालेल्या टोळक्याने मारहाण करुन गळ्यातील चांदीची चैन हिसकावली. त्यांना शांत करणार्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार जेल रोडवर शनिवारी पहाटे सव्वातीन वाजता घडला.
याबाबत सुरज बापुराव रणसिंग (वय ३२, रा. घोरपडी बाजार) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ज्ञानेश्वर सुंदर नटकले (वय २६), राहुल संजय साळवे (वय २३), रोहित अशोक डोंगरे (वय २७, सर्व रा. भिमनगर, विश्रांतवाडी), सिद्धी कांबळे (वय २४, रा. आंबेडकर सोसायटी, साप्रस, येरवडा), हर्षल भोसले (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज रणसिंग हे भारतीय लष्कर सेवे मध्ये पोलीस हवालदार आहेत. त्यांची सध्या घोरपडी बाजार येथील द हेरिटेझ एस सी आय बी येथे नियुक्ती आहे. आर्मीचे प्रमुख ब्रिगेडियर कपूर यांची फॅमिली पुणे ते चंदीगड असे विमानाने जाणार होते. त्यासाठी प्रोटोकॉलकरीता रणसिंग व राकेश हलदार यांची नेमणूक करण्यात आली होती. कपूर यांच्या फॅमिलीला एअरपोर्टवर सोडून पहाटे सव्वातीन वाजता ते स्विफ्ट कारने परत जात होते. त्यावेळी जेल रोड चौकीच्या पुढे तीन दुचाकीवर ५ मुले व २ मुली जात होत्या. ते संपूर्ण रस्ता व्यापून जात होते. त्यामुळे रस्ता द्यावा म्हणून त्यांनी व्हॉर्न वाजविला.
त्याचा या मुलांना राग आला. त्यांनी रस्त्यात गाड्या उभ्या करुन कारचा रस्ता अडविला. ते कारजवळ आले. फिर्यादी यांनी आपले आय कार्ड दाखवून आम्ही आर्मीचे कर्मचारी आहोत, असे सांगितले. तरी सुद्धा त्यांनी राकेश हलदार यांना धक्काबुक्की करीत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. रणसिंग यांनाही धक्काबुक्की केली. राकेश हलदार यांच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावून घेतली. हातातील मोबाईल हिसकावला. त्यांच्यातील दोन मुलींपैकी एका मुलीने दारु पिली होती. ती त्यांना जोरजोरामध्ये शिवीगाळ करत होती. त्यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल करण्याबाबत धमकी देत होती. त्याचवेळी या परिसरात गस्तीवर असलेले दोन पोलीस अंमलदार गाडीवरुन तेथे आले. त्यांनी सर्व मुलांना शांत राहण्याबाबत सुचना देत होते.
तरीही ते आरडाओरडा करत होते. ते पोलिसांना धक्काबुक्की करु लागले व शिवीगाळ करु लागले. ती चार मुले फिर्यादींना तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करु, जीवे ठार मारु अशी धमकी देत होते. त्यानंतर आसपासच्या परिसरातील काही लोक तेथे जमा झाले. या मुलांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यातील एकाच्या खिशात हलदार यांची चांदीची चैन मिळून आली. त्यावेळी त्यांच्यातील एक मुलगा व मुलगी पळून गेले. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणल्यावरही तिघे जण वारंवार आरडाओरडा करत होते. येरवडा पोलिसांनी दंगा मारामारी करणाऱ्या या पाच जणांना अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.