शासनाने डिझेलचे पैसे दिले नाहीत; जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या पाहुण्यांना नाकारली गाडी
चंद्रपूर : खरा पंचनामा
माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि राज्याचे अतिथी हंसराज अहीर यांना इंधन नसल्याने जिल्हा प्रशासनाने गाडी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहीर यांना सरकारकडून राज्य अतिथींचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांनाच अशी वागणूक दिल्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहे.
हंसराज अहीर यांना शासकीय दौऱ्यासाठी वाहन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. 4 एप्रिलला 2025 रोजी दिल्ली येथून आले असता 4 दिवस त्यांना शासकीय दौरा करायचा होता. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर चंद्रपूरचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या दौऱ्याचा इंधन निधी मिळाला नसल्याने पेट्रोल पंपाच्या संचालकाने इंधन देण्यास नकार दिला असल्याचे अहीर यांना सांगितले. त्यावेळी सलग 15 दिवस अहीर यांना गाडी देण्यास नकार दिला.
एवढचे नव्हे तर त्यांच्या सचिवांना स्वतः इंधन भरल्यास वाहन उपलब्ध करून देऊ असा निरोप दिला. त्यानंतरच्या महिन्यात फक्त 3 दिवस गाडी उपलब्ध करून दिली. नंतर वाहन देणेच बंद केले. सातत्याने जिल्हा प्रशासनामार्फत राज्याच्या अतिथींना अवमानजनक वागणूक दिली जात असल्याने अहीर यांच्यावतीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हंसराज अहीर यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य अतिथीशी संबंधित हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने चौकशीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.