Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आरटीओ ई-चालान 'वर क्लिक करताच बँक खात्यातून उडाले 5 लाख रुपये

'आरटीओ ई-चालान 'वर क्लिक करताच बँक खात्यातून उडाले 5 लाख रुपये

भंडारा : खरा पंचनामा

'आरटीओ ई-चालान'वर क्लिक करताच बँक खात्यातून तब्बल 5 लाख रुपये उडाल्याचे घटना भंडारा शहरातघडली आहे. आरटीओच्या नावाने बनावट ई-चालान पाठवून नागरिकांना लुटण्याचा सायबर लुटारूं नी नवा फंडा अवलंबला असल्याचे यातून समोर आलं आहे. परिणामी, पैशाचे व्यवहार करताना सुरक्षित वेबसाईटवरूनच करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यां नी नागरिकांना केलं आहे.

गोंदिया शहरातील सराफा लाइन, दुर्गा चौक येथे राहणारे विवेक अग्रवाल (वय 49) या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यातून तब्बल 5 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अग्रवाल यांच्या मोबाइलवर 'आरटीओ ई-चालान एपीके' या नावाची लिंक आली. त्यांनी ती लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला. काही क्षणातच त्यांना एचडीएफसी बँकगोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्यातून 5 लाख रुपये आयएमपीएसद्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला. बँकेत चौकशी केली असता, संबंधित रक्कम ओडिशा राज्यातील पुरी शहरातील एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अशुतोष नायक नावाच्या व्यक्तीने दुपारी 3.37 वाजता चेकद्वारे संपूर्ण रक्कम विड्रॉल केली असल्याचे नोंदीत दिसून आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.