महाराष्ट्रातील 8800 एकरांहून अधिक जमीन अदानी घेणार विकत
'या' 2 शहरांची मालकी अदानींकडे
मुंबई : खरा पंचनामा
अदानी समूहाची रिअल इस्टेट बँच असलेल्या अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडकडून महाराष्ट्रातील काही हजार एकर जमीन विकत घेतली जाणार आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात एक काळ गाजवणाऱ्या सहारा समूहाच्या अनेक मालमत्ता अदानी समुहाकडून विकत घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात अदानी समुहाने सकारात्मक निर्णय घेतला असल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'ने दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयासमोरील दीर्घकाळापासून सहारा समुहासंदर्भात वाद सुरु आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सहारा समूहाला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश देत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता अदानी समूहाने सहाराच्या मालकीच्या प्रॉपर्टी विकत घेण्याची तयारी दाखवली आहे.
सहारा समूहाने गुंतवणूकदारांचे 24 हजार 30 कोटी रुपयांची परतफेड करावेत असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या आदेशानंतर कालांतराने, सहारा समूहाने काही मालमत्ता विकल्या आणि सेबीकडे परतफेड करण्यासंदर्भातील सुमारे 16 हजार कोटी जमा केले.
ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त किंमत मिळवण्यासाठी, सहाराने त्यांच्या उर्वरित बहुतेक मालमत्ता एकाच लॉटमध्ये एकाच कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला असून या व्यवहारामधील खरेदीदार कंपनी अदानी समूह आहे. सहारा आणि अदानींच्या या करारात 88 हून अधिक मालमत्तांचा समावेश आहे. या 88 मालमत्तांमध्ये भारतातील उच्च-मूल्याच्या जमिनी आणि इमारतींचा समावेश आहे. काही प्रमुख मालमत्तांमध्ये महाराष्ट्रातील 8800 एकरची अँबी व्हॅली सिटी, मुंबईतील हॉटेल सहारा स्टार, 170 एकरची सहारा सिटी आणि वेगवेगळ्या राज्यांमधील इतर अनेक मालमत्तांचा समावेश आहे. अँबी व्हॅली सिटी आणि सहारा सिटीची मालकी अदानींकडे जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.