नागरिकांच्या तक्रार निवारणाची विशेष मोहीम, 90 टक्के तक्रारींचा निपटारा : फुलारी
अट्टल गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा इशारा
सांगली : खरा पंचनामा
आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील अट्टल गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढले जात आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ६ टोळ्यातील ६८ गुन्हेगारांवर मोका कायद्यातर्गंत कारवाई करण्यात आली आहे. अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गेल्या दोन महिन्यात अर्ज अदालत घेतली. कोल्हापूर परीक्षेत्रातील 90 टक्के तक्रार अर्जनिकाली काढण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महानिरीक्षक फुलारी यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस दलाचा आढावाही घेतला. ते म्हणाले, दर शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन होत आहे. गेल्या एक वर्षापासून पोलिसांकडे प्रलंबित असलेले तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले. जवळपास ९० टक्के तक्रारींचा निपटारा केला आहे. भविष्यात नागरिकांना अर्जावरील कारवाईची माहिती मेसेजद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी कवठेमहांकाळ, चडचण, दिल्ली आणि कराडमधील सोने चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल सांगली पोलिस दलाचे कौतुकही केले.
कवठेमहाकाळमधील बोगस आयकर छापेमारीतील गुन्हेगार कोल्हापूर व पुणे येथील आहेत. कट रचून गुन्हे करण्याचे प्रकार सुरू आहेत. चडचणमधील सोने चोरीच्या गुन्ह्यातील सोने हस्तगत केले आहे. दिल्लीतील सोने चोरीप्रकरणी सांगलीतील दोघांना अटक केली आहे. शिरवळजवळील दरोड्यात आंतरराज्य टोळीचा सहभाग होता. या घटना पाहता अनेक गुन्हेगार पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगार बाहेर जिल्ह्यात जावून गुन्हा करत आहेत. अट्टल गुन्हेगारांच्या टोळीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत ६८ जणांवर मोका लावला असून काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. पिस्तूल बाळगल्याचे १५ गुन्हे दाखल आहेत. त्यात मध्यप्रदेशामधून पिस्तूलची तस्करी होत असल्याचे समोर आले. आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात कडक कारवाई करण्यात येत आहे, असेही फुलारी यांनी सांगितले.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले,‘‘अंमली पदार्थाविरोधात जिल्ह्यात चांगली कामगिरी झाली आहे. नशामुक्त महाराष्ट्र अभियानात सांगलीचे योगदान मोठे आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या आदि अमली पदार्थ मोठ्याप्रमाणात जप्त केले आहेत. तस्कारांवर कारवाई केली आहे. हे अमली पदार्थ न्यायालयाच्या आदेशाने ३० सप्टेंबरपर्यत नष्ट येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.