Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा

पाटणा : खरा पंचनामा

बिहारमध्ये एनडीए कार्यकर्त्यांचं शिबिर पार पडलं. मुजफ्फरपूरमध्ये या शिबिरावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला भाजपची टोपी घालण्यात आली होती. तसंच पक्षाचं चिन्ह असलेला झेंडाही पुतळ्याला बांधला होता.

या शिबिरात शाहनवाज हुसैन, जदयू कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्यासह अनेक एनडीएचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. महात्मा गांधींच्या पुतळ्याला पक्षाची टोपी, गळ्यात मफलर आणि पक्षाचा झेंडा लावल्यानं नवा वाद निर्माण झालाय. विरोधकांनी यावर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

मुजफ्फरपूरमध्ये मीनापूर हायस्कूल मैदानात एनडीएचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याठिकाणी असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी घातली गेली आणि पक्षाचा झेंडाही बांधण्यात आला. याविरोधात राजद आमदार मुन्ना यादव यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करण्यात आली. असं कृत्य करणाऱ्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी करत राजदने गंगाजल वापरून महात्मा गांधींच्या पुतळ्याला स्नान घातलं.

पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधीजींचा असा अपमान सहन केला जाणार नाही. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं राजदने म्हटलं. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. शनिवारी रात्रीच टोपी आणि झेंडा जप्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

मुजफ्फरपूर तिलक मैदान परिसरात काँग्रेसची बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला भाजपची टोपी घालण्याच्या कृत्याचा निषेध केला. पक्षाचे प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी करणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.