Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उपराष्ट्रपतींच्या सचिवपदी निवृत्त आयएएस अमित खरे यांची नियुक्ती

उपराष्ट्रपतींच्या सचिवपदी निवृत्त आयएएस अमित खरे यांची नियुक्ती

नवी दिल्ली : खरा पंचनामा

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून केंद्र सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) माजी अधिकारी अमित खरे यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीकडून खरे यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला आहे.

खरे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे.

दिल्लीतील सेंट स्टिफन्स महाविद्यालय तसेच अहमदाबाद येथील आयआयएम मधून शिक्षण घेतलेल्या खरे यांच्या पत्नी निधी या १९९२ च्या तुकडीतील 'आयएएस' अधिकारी आहेत. खरे यांची सचिव पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.