"विशेष अधिवेशनाची घोषणा करावी"
मुंबई : खरा पंचनामा
मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांची पिके, फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत, तर काही ठिकाणी जमीनच खरडून गेली आहे.
अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून संसार उघड्यावर पडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची गुरे वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांची आयुष्यभराची कमाई या अतिवृष्टीत वाहून गेली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावर चर्चा करुन ठोस उपाय काढण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा यासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा करावी ! राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकरी, जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही. शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसान भरपाई व मदत पॅकेजवर सखोल चर्चा व्हावी, भरीव मदतीचा निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने माननीय राज्यपाल महोदयांना केली. याप्रकारची पोस्ट करत आमदार जयंत पाटील यांनी तातडीने अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे.
पावसाने जमिनी खरडून गेल्या असतील तर त्यांना तीस हजार प्रति एकर मदत द्यावी जनावरांसाठी किमान साठ हजार द्यावेत, शेतकरी जगला पाहिजे, पुन्हा कामाला लागला पाहिजे. कर्जमाफी करण्यासाठी यापेक्षा दुसरी कोणती वेळ योग्य असेल? सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी. सरकार इतर ठिकाणी पैसे खर्च करते. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाहीत असे म्हणता येणार नाही. सरकार मायबाप आहे. मायबाप कधी मुलांना सांगते का की माझा पगार झाला नाही. आता कोणतेही कारण न देत सरकारने कर्जमाफी द्यावी असे जयंत पाटील यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.