Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुरुंगात टोळीयुद्धाचा भडका; तुरुंग अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

तुरुंगात टोळीयुद्धाचा भडका; तुरुंग अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून नेहमीच राजकीय वाद उफाळत असतो. राज्यातील रस्त्यांवर होणारे गँगवॉर आता तुरुंगात सुरू झाले आहेत. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात गँगवॉर उफाळला आहे. यातून थेट तुरुंग पोलिस अधिकाऱ्याला लक्ष्य करण्यात आले.

या गँगवॉरमध्ये तुरुंग पोलिस अधिकारी राकेश चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांचे डोके अन् डोळा गुंडांनी फोडला. गंभीर जखमी झालेले राकेश चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गँगवॉरचा प्रमुख कारण असलेला कैदी अयान सैफुद्दीन खान याच्याविरोधात एन. एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कैदी अयान सैफुद्दीन खान याने सुरूवातीला त्याच्या बॅरेकमध्ये वाद घातले. यातून त्याने तिथल्या दोन ते तीन कैद्यांशी भांडण सुरू केली. ही भांडण वाढत जाऊन, त्याचा हाणामारीत रूपांतर झाले. कैद्यांच्या हाणामारी वाढल्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. या हाणामारीमुळे तर कैद्यांमध्ये देखील वाद उफळला. एकप्रकारे गँगवॉरला सुरूवात झाली.

कैद्यामधील ही भांडण थांबवण्यासाठी तुरुंग पोलिस अधिकारी राकेश चव्हाण मध्यस्थी करत होते. काही सहकाऱ्यांच्या मदतीने ते परिस्थिती नियंत्रणात आणत होते. पण कैदी आक्रमक होते. या कैद्यांनी थेट राकेश चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. या हाणामारीच्या गोंधळाचा फायदा घेत, कैदी अयान सैफुद्दीन खान याने राकेश चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

कैदी अयान सैफुद्दीन खान याने अचानक केलेल्या हल्लामुळे सावध नसलेले राकेश चव्हाण गंभीर जखमी झाले. अयान खान याने राकेश चव्हाण यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर चेहऱ्यावर मारहाण करताना, त्यांच्या डोळा फोडला. यात राकेश चव्हाण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यावेळी कैदी अयान सैफुद्दीन खान सतत शिवीगाळ होता. राकेश चव्हाण यांच्या अंगावर धावून जात होता.

जखमी राकेश चव्हाण यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. अतिरीक्त बंदोबस्त बोलावून कैद्यांमधील गँगवॉर थांबवण्यात आला. तुरुंगातील पोलिस या हाणामारी थांबवत होते, पण अयान सैफुद्दीन खान हणामाऱ्या करतच होता. पोलिसांना आव्हान देत होता. त्यांच्या कामात कामात अडथळा आणत राहिला. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत अयान सैफुद्दीन खान याला बॅरेकमध्ये बंद केले.

तुरुंगातील ही घटना म्हणजे गँगवॉर असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या गँगवॉरमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. जखमी अधिकारी राकेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून, आरोपी कैदी अयान सैफुद्दीन खानविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.