महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना सन्मानपत्र प्रदान
मिरजेतील श्री गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे वारकऱ्यांच्याहस्ते गौरव
मिरज : खरा पंचनामा
मिरजेतील महात्मा गांधी चौक गणेश मंडळातर्फे पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल तसेच जिल्ह्यात नशामुक्त अभियानाची प्रभावी अमलाबजावणी केल्याबद्दल महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचा मिरजेतील श्रीगुरु दादासाहेब आजरेकर फड हरीमंदिरच्या ज्येष्ठ वारकऱ्यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यंदा या मंडळाचे 71 वे वर्ष आहे.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य, पत्रकार जालिंदर हुलवान यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी हुलवान यांनी श्री. शिंदे यांनी नशामुक्त भारत अभियान अंतर्गत केलेल्या कारवाईची माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना सहायक निरीक्षक शिंदे म्हणाले, पोलीस हेही समाजाचाच एक घटक आहे. भविष्यात तरुण पिढी व्यसनमुक्त होऊन चांगले नागरिक तयार व्हावेत यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरु आहेत. मिरज शहरासह जिल्हा नशामुक्त करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रयत्न सुरूच राहतील.
यावेळी ह. भ. प. दत्तात्रय सरवदे, ह. भ. प. दीपक व्हावळ, ह. भ. प. अनिल पोरे, ह. भ. प. सुरेश बोंगाळे, ह. भ. प. पांडुरंग सुतार, डॉ. सूर्यकांत व्हावळ, माजी नगरसेवक गणेश माळी, उद्योजक अतुल खोत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सलग 35 वर्षे मंडळाचा महाप्रसाद बनवणारे मुबारक आचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रभात हेटकाळे, धनंजय गडदावर, अशोक कदम, विनायक शेडबाळे, पप्पू सावंत, विजय अस्वले, विनोद सावंत, गजेंद्र कीर, अभिषेक भोसले, इम्तियाज पठाण, पप्पू सावंत, प्रभाकर अस्वले, प्रेम चिंतनवार, बंटी समुद्रे, नंदू निकम, आदींनी संयोजन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.