Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कार दुभाजकाला धडकून कडेगावच्या प्रांताधिकाऱ्यांच्या मुलीचा मृत्यू

कार दुभाजकाला धडकून कडेगावच्या प्रांताधिकाऱ्यांच्या मुलीचा मृत्यू

पंढरपूर : खरा पंचनामा

कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. हा अपघात पंढरपूर महामार्गावर दसुरपाटीनजीक झाला. या अपघातात कडेगाव-पलूसचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांची कन्या इक्षिता रणजित भोसले (वय ६, रा. राजवडी, ता. माण, जि. सातारा) हिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजण्यास सुमारास घडली.

मंगळवारी (ता. २) इक्षिता हिचा वाढदिवस होता. यादिवशी सर्व कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात तिचा वाढदिवस साजरा केला होता, तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ३) प्रांताधिकारी भोसले यांचे सासू - सासरे, इक्षिता व अन्य नातेवाईक असे एकूण पाच जण राजवडीहून कारने पंढरपूरला देवदर्शनाला निघाले होते.

जात असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर महामार्गावर दसुरपाटीनजीक सदर कार रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात डोक्याला मार लागून इक्षिता गंभीर जखमी झाली. त्यानंतर नातेवाइकांनी तिला अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, तर अपघातात मोटारकारमधील अन्य चारजण किरकोळ जखमी झाले. गुरुवारी (ता. ४) राजवडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.