Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धचा फोन टॅपिंग प्रकरणी मानहानीचा दावा रद्द

रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धचा फोन टॅपिंग प्रकरणी मानहानीचा दावा रद्द

नागपूर : खरा पंचनामा

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा दावा न्यायालयाने रद्द केला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आनंद मुंडे यांनी हा निर्णय दिला. पटोले यांनी ५०० कोटी रुपयांचा दावा केला होता. हा दावा पुणे येथील बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित होता.

रश्मी शुक्ला पुणे पोलिस आयुक्त असताना २०१७-१८ मध्ये वादग्रस्त फोन टॅपिंग करण्यात आले होते. चौकशी समितीच्या अहवालानुसार गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी शुक्ला व इतरांविरुद्ध २५ फेब्रुवारी २०२२ रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

हा मानहानीचा दावा प्राथमिक टप्प्यावरच रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेमधील ऑर्डर-७/नियम-११ अंतर्गत अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. पोलिस तक्रारीतील आरोपांमुळे मानहानीचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही. तसेच, तक्रारीमध्ये पटोले यांच्यावर कोणतेही आरोप करण्यात आले नाही. ती तक्रार पटोले यांच्या विरोधात नाही. याशिवाय, संबंधित एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हे मुद्दे दिवाणी न्यायालयाने हा निर्णय देताना विचारात घेतले. शुक्ला यांच्यातर्फे वरिष्ठ अॅड. देवेंद्र चव्हाण, तर पटोले यांच्यातर्फे अॅड. ए. आर. पाटणे यांनी बाजू मांडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.