Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी

मुंबई : खरा पंचनामा

सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे, ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर नाव समोर आलं आहे, गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएच्या वतीनं उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. सी.पी. राधाकृष्णन यांचा या निवडणुकीत विजय झाला. सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती बनले आहेत. दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचं नाव समोर आलं आहे. गुजरातचे राजपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

आचार्य देवव्रत हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत, ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत. दरम्यान ते यापूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील होते. आचार्य देवव्रत हे हिमाचल प्रदेशचे जवळपास चार वर्ष राज्यपाल होते. 2015 पासून ते 2019 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर ते 2019 मध्ये गुजरातचे राज्यपाल झाले, आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल होते. मात्र त्यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला, ते उपराष्ट्रपती झाले, सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याबाबत उत्सुकता होती, अखेर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते आता गुजरातसोबतच महाराष्ट्राचीही जबाबदारी सांभाळणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.