Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोरेगांवच्या उपाधीक्षकपदी कर्तव्यदक्ष राजश्री पाटील-तेरणी यांची नियुक्तीकायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्याची दिली ग्वाही

कोरेगांवच्या उपाधीक्षकपदी कर्तव्यदक्ष राजश्री पाटील-तेरणी यांची नियुक्ती
कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्याची दिली ग्वाही

संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा

राज्य गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये काही अधिकार्‍यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये कोरेगांव तालुक्यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांची प्रमोशनने नागपूर ला बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजश्री पाटील-तेरणी यांची नियुक्ती झाली आहे. 

राजश्री पाटील-तेरणी यांची प्रथमच सातारा जिल्हा पोलीस दलात नव्याने येत आहेत. त्या कोरेगांव ग्रामीणला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लवकरच त्या रुजू होणार आहेत. राजश्री पाटील-तेरणी या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यांतील हिंटणीच्या असुन सर्व सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. राजश्री पाटील-तेरणी यांना कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून चांगलेच ओळखले जाते. कोरेगांव उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून या तिसऱ्यांदा महिला अधिकारी ठरल्या आहेत. राजश्री पाटील-तेरणी लवकरच कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.