Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नाशिकच्या इगतपुरीत अवैध कॉल सेंटरवर छापा : दोघांना अटक

नाशिकच्या इगतपुरीत अवैध कॉल सेंटरवर छापा : दोघांना अटक

नाशिक : खरा पंचनामा

शहरातील मीनाताई ठाकरे संकुलांच्या गाळ्यांमध्ये अवैध क्रेडिट कार्ड रक्कम, कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉलसेंटरवर इगतपुरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (दि. १९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सारीका अहिरराव यांना व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सोमवार (दि. १५) सायंकाळी ६ वा. शहरातील मीनाताई ठाकरे संकुल येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी क्रेडीट कार्डद्वारे दिले गेलेल लोन, गृह कर्ज व संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरीता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजाऱ्यांना बँकेकडील बनावट ओळख धारणकरुन बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले.

या ठिकाणी ४० ते ५० कर्मचारी काम करत असल्याचे तसेच हे कर्मचारी अवैधरित्या कर्जदारांचा वैयक्तीक डाटा संकलीत करत असल्याचे दिसून आलेले आहे. या कॉल सेंटरला स्थानिक नगरप्रशासनाचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले. या कॉल सेंटरवर आरबीएल, एचडीबी फायनान्स, ग्रो फायनान्स यांचे कर्जवसुलीचे काम करत असल्याचे दिसून आले. गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्यातील नागेश मोहीते हे करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.