Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अहिल्यानगरचा पत्ता, मग नावाच्या स्पेलिंगमध्ये हेराफेरी

अहिल्यानगरचा पत्ता, मग नावाच्या स्पेलिंगमध्ये हेराफेरी

पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील गुंड निलेश बन्सीलाल घायवाल, ज्यावर अनेक गुन्हेगारी खटले सुरू आहेत, त्याने अहिल्यानगर पोलिसांकडून निगेटिव्ह अॅड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळूनही बेकायदेशीरपणे पासपोर्ट मिळवला आणि तो लंडनला पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

पण कुख्यात गुंड निलेश घायवळने पुण्यातील गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. यासाठी त्याने नावात बदल करून 'घायवळ'ऐवजी 'गायवळ' असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत २३ डिसेंबर २०१९ रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता.

निलेश घायवळवर पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पासपोर्ट मिळणार नाही हे ओळखून त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील खोटा पत्ता वापरायचं ठरवलं. त्याने २३ डिसेंबर २०१९ ला पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यासाठी त्याने नावात देखील बदल केला. निलेशने त्याच नाव घायवळ ऐवजी गायवळ असं अर्जावर नमुद केलं. म्हणजे Ghaywal या नावातील h काढून Gaywal असं केलं. त्याचबरोबर अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोटा पत्ता त्याने नमुद केला. त्याने गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड ४१४००१ असा पत्ता दिला.

पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळचा अर्ज तपासणीसाठी कोतवाली पोलीसांकडे पाठवण्यात आला असता कोतवाली पोलीसांच्या मते त्यांनी घायवळने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली. मात्र त्यांना निलेश घायवळ त्याठिकाणी रहात असल्याचे आढळून आले नाही. त्याचबरोबर निलेश घायवळ सोबत त्यांचा संपर्क देखील झाला नाही. मात्र आश्चर्य म्हणजे कोतवाली पोलीसांनी पासपोर्ट कार्यालयाला Not available एवढाच अभिप्राय पाठवला. त्याहुन आश्चर्य म्हणजे पासपोर्ट कार्यालयाने घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे इतर निकष वापरुन १६ जानेवारी २०२० ला पासपोर्ट मंजुर केला आणि घायवळला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर २०२१ मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हिजा मिळवून युरोपला फिरायला गेला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.