डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने सपासप वार करत पत्नीचा खून
हातकणंगले : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात भदोले गावात कोयत्याचे वार करत पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास भादोले-कोरेगाव रस्त्यावरील ओढ्याच्या पुलाजवळ ही घटना घडली आहे.
रोहिणी प्रशांत पाटील (वय 29) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती प्रशांत मारुती पाटील ऊर्फ गुंडा मिस्त्री याने हा संशयित आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पसार झालेला प्रशांत मारुती पाटील याला वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भादोले येथे राहणारा प्रशांत पाटील याचा ग्रामपंचायतच्या गाळ्यात दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्याचा 8 वर्षांपूर्वी ढवळी (ता. वाळवा) येथील रोहिणी हिच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना 3 वर्षांची एक आणि 6 वर्षांची अशा दोन मुली आहेत. रोहिणीचे वडील म्हणजेच प्रशांतचे सासरे आजारी असल्याने वारंवार रोहिणीला माहेरी जावे लागत होते. दुपारी दोघेही दुचाकीवरून ढवळीला (रोहिणीच्या माहेरी) गेले होते. रात्री आठच्या सुमारास परत येत असताना वारणा नदीचा पूल ओलांडल्यानंतर गावानजीक असणाऱ्या ओढ्याजवळ प्रशांतने गाडी थांबवून रोहिणीच्या डोळ्यात चटणी फेकली आणि कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने रोहिणी जागीच कोसळली. डोक्यात व मानेवर गंभीर वार झाल्याने रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. हे वार चुकवण्याच्या प्रयत्नात रोहिणीच्या दोन्ही हातांवरदेखील कोयत्याचे वार आढळून आले आहेत.
निर्मनुष्य ठिकाण, त्यात रात्रीची वेळ असल्याने रोहिणीला बचाव करण्यासाठी करता आला नाही. सपासप वार केल्यानंतर रोहिणीच्या अंगावरच कोयता टाकून प्रशांतने तिथून पळ काढला. आपण रोहिणीचा खून करून आलो असल्याचे त्याने घरी जाऊन सांगितले. कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता रोहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हादरले. त्यानंतर वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी कोयता आणि हातोडा देखील पडला होता.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.