बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याचा कृष्णा नदीत सापडला मृतदेह
राजकीय हस्तक्षेपामुळे आत्महत्येचा कुटुंबीयांचा आरोप
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात एका बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. राजकीय हस्तक्षेपातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय आहे. दरम्यान नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
अवधूत अशोक वडार (वय 27) असे मृत अभियांत्याचे नाव असून हा तरुण जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागामध्ये कनिष्ठ अभियंता पदावर नोकरीस होता. सरकारी कामात राजकीय हस्तक्षेप करत दबाव टाकण्यात आल्याने अवधूतने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, मात्र हा घातपात असल्याची शंका अवधूतच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जतमधील महिला माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती असलेले सुनील पवार, आमदाराचा पीए म्हणवणारा एकजण आणि जतच्या पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांकडून अवधूतवर शासकीय कामात दबाव टाकला जात होता, असा आरोप अवधुतच्या कुटुंबाने केलाय. अवधूत या दबावामुळे काही दिवसांपासून तणावात होता, तसेच त्याचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते असा आरोप अवधूतच्या चुलत्याने केलाय. याच कारणातून अवधूतने एकतर आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा असाही संशय कुटुंबांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत जतमधील ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिलीय त्या व्यक्तींच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्याच्या कुटुंबांने घेतला आहे.
सकाळी दहाच्या सुमारास सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास कृष्णा नदीपात्रात नवीन पुला खाली पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून सांगली शासकीय रुग्णालयात पाठवला होता.
वडार यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईकांनी सांगलीसिव्हिलहॉस्पिटल येथे येऊनमृतदेहाची पाहणी करत शहानिशी केली. पण, अवधूतचा घातपात झाला असावा असाही संशय त्याच्या कुटुंबांनी व्यक्त केला आहे. तसेच जतमधील ज्याच्या विरोधात तक्रार दिलीय त्या व्यक्तींच्या नावावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा त्याच्या कुटुंबांने घेतला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.