सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमधील तरुण आक्रमक
संसदेत घुसण्याचा प्रयत्न, दोघे जखमी
काठमांडू : खरा पंचनामा
नेपाळमध्ये फेसबूक आणि इंस्टाग्राम सारख्या २६ सोशल मीडिया अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तेथील तरुण-तरुणी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात आज काठमांडू विराटनगर, भरतपूर येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी काही तरुणांनी संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोशल मीडिया अॅपवरील बंदीविरोधात नेपाळमधील तरुण आक्रमक झाले आहेत. या तरुणांनी आज रस्त्यावर उतरून सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तरुणांच्या या जमावाने नेपाळच्या संसदेत शिरण्याचाही प्रयत्न केला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला. काही ठिकाणी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. या तणावपूर्ण परिस्थितीनंतर काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. यात दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आमच्या व्यवसायावर तसेच मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला असल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. ही बंदी त्वरीत मागे घ्यावी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, ही बंदी योग्य असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कॉम्युनिकेशन आणि आयटी मंत्री प्रिथ्वी सुभ्बा गुरुंग यांनी सांगितले की, "आम्ही वारंवार सूचना दिल्या, पण कंपन्यांनी दुर्लक्ष केले. ही बंदी चुकीची माहिती रोखण्यासाठी आवश्यक आहे."
दरम्यान, नेपाळच्या एकूण लोकसंख्येपैकी ९० टक्के नागरिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. मात्र, युट्यूब आणि गिटहबसारख्या अॅपवर बंद घातल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. सोशल मीडियावर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यापार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्याच्या अभ्यासावरही होतो आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.