Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"न्यायालयाला राजकारणाचं मैदान बनवणं योग्य नाही. जर तुम्ही राजकीय नेते आहात तर तुमचं कातडंही जाड असायला हवं"

"न्यायालयाला राजकारणाचं मैदान बनवणं योग्य नाही. जर तुम्ही राजकीय नेते आहात तर तुमचं कातडंही जाड असायला हवं"

नवी दिल्ली : खरा पंचनामा

सर्वोच्च न्यायालयाने २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेलंगनाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांच्या भाषणाविरोधात दाखल केलेल्या मानहानी याचिकेवरून भाजपलाच फटकारलंय. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, न्यायालयाला राजकारणाचं मैदान बनवणं योग्य नाही. जर तुम्ही राजकीय नेते आहात तर तुमचं कातडंही जाड असायला हवं. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.

सरन्यायाधीश बीआर गवई, न्यायमूर्ती विनोद चंद्रन, न्यायमूर्ती अतुल एस चंदुरकर यांच्या पीठाने म्हटलं की, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास आम्ही इच्छुक नाही. आम्ही सतत सांगत आलोय की न्यायालयाचा वापर राजकीय लढाईसाठी करू नका. याचिका फेटाळून लावत आहोत. जर तुम्ही नेता आहात तर तुमचं कातडं जाड असायला हवं.

तेलंगनाच्या उच्च न्यायालयाने रेड्डी यांच्या याचिकेवर सुनावणी केली होती. त्यात कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित प्रकरणी सुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती. भाजपच्या तेलंगनातील नेत्यांनी रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना आरोप केला होता की रेड्डी यांनी पक्षाविरोधात अपमानास्पद आणि भावना भडकावणारं भाषण केलं.

रेड्डी यांनी तेलंगना काँग्रेस सोबत मिळून एक खोटी आणि संशयास्पद राजकीय अजेंडा राबवला. भाजप सत्तेत आल्यास आरक्षण संपवू असं पसरवलं. हे मानहानी करणारं असून यामुळे भाजपच्या प्रतिष्ठेला तडा गेला असल्याचं याचिकेत म्हटलं होतं.

दरम्यान, उच्च न्यायालयाने भाजपच्या तक्रार आणि आरोपांनंतर कनिष्ठ न्यायालयाने रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे दिलेले आदेश रद्द ठरवले. राजकीय भाषणं ही वाढीव असतात. त्यात आदेश रद्द ठरवले. राजकीय भाषणं ही वाढीव असतात. त्यात बऱ्याचदा पूर्ण न होणारी आश्वासने, खोटे आरोप यांचा समावेश असतो. त्यामुळे असं भाषण मानहानीकारक आहे असा आरोप करणं अतिशयोक्ती ठरेल असं हायकोर्टाने म्हटलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.