Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली शहरच्या पोलीस उपाधीक्षक, आयपीएस अधिकारी विमला एम. यांची बदली

सांगली शहरच्या पोलीस उपाधीक्षक, आयपीएस अधिकारी विमला एम. यांची बदली 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने बुधवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. 

सहायक पोलीस अधीक्षक, सांगली शहरच्या प्रभारी उपाधीक्षक विमला एम. यांची बदली करण्यात आली आहे. समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. १९, अहिल्यानगर या पदावर त्यांची बदलीनंतर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे.

तसेच सहायक पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक अग्रवाल यांची बदलीने पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.