राज्यातील चार पोलीस उपअधीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना
९ उपअधीक्षकांची बदली तर ७ जणांची बदलीने सुधारित पदस्थापना
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील चार पोलीस उपअधीक्षकांना पदोन्नती देण्यात आली असून पदोन्नतीनंतर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. ९ उपअधीक्षकांची बदली करण्यात आली असून ७ उपअधीक्षकांची बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने गुरुवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी ः
अजित टिके ः पोलीस अधीक्षक (कृती) अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नागपूर
आरती बनसोडे ः उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, कोकण, मुंबई
नारायण शिरगावकर ः समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ गडचिरोली
नितीन जाधव ः पोलीस अधीक्षक युसीटीसी फोर्स वन, मुंबई
बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी ः
वैशाली वैरागडे ः सहायक पोलीस आयुक्त नागपूर ते अपर उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता, नागपूर
ज्योत्स्ना मसराम (मेश्राम) ः पोलीस उपअधीक्षक अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर ते पोलीस उपअधीक्षक नक्षल विरोधी अभियान, नागपूर
रोशन पंडित ः उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर ते सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर
स्वप्निल राठोड ः उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव, बुलढाणा ते सहायक पोलिस आयुक्त ठाणे शहर
संपत शिंदे ः पोलीस उपअधीक्षक अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट ते सहायक पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर
माणिक बेद्रे ः उपविभागीय पोलीस अधिकारी बीड ते सहायक पोलिस आयुक्त मुंबई शहर
अशोक कदम ः पोलीस उपअधीक्षक सीआयडी पुणे ते अपर पोलिस अधीक्षक (एटप) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड
बदली करण्यात आलेले अधिकारी ः
राजेंद्र शिरतोडे ः सहायक पोलीस आयुक्त मुंबई ते उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड परभणी
दिलीप टिपरसे ः उपविभागीय पोलिस अधिकारी गंगाखेड ते उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर
दर्शन दुगड (भापोसे) ः सहायक पोलीस अधीक्षक नियंत्रण कक्ष पोलीस महासंचालक कार्यालय ते उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प
प्रदीप पाटील ः उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर बुलढाणा ते उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव बुलढाणा
अशोक राजपूत ः पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर
विजय कुंभार ः सहायक पोलीस आयुक्त सोलापूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर
विजयालक्ष्मी कुरी ः सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त सोलापूर शहर
श्वेता खाडे ः सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर ते पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग
अश्लेषा हुले ः पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सातारा ते पोलीस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.