स्पेशल 26 मधल्या महिलेसह तिघांना अटक
15 लाख रोकड, 1,410 ग्रॅम सोने जप्त; मास्टरमाईंड जयसिंगपूरचा : पोलीस अधीक्षक संदीप घुगे
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी अक्षयकुमारच्या स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे बनावट आयकर अधिकारी बनून छापा टाकून रोकड, सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा मास्टरमाईंड जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील असून त्याच्यासह अन्य संशयितांचा शोध सूरू आहे. अटक केलेल्या तिघांकडून 15 लाखांची रोकड, 1,410 ग्रॅम सोन्याचे दागिने, बिस्किटे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
दिक्षा राष्ट्रपाल भोसले (वय २५, रा. काकडे पार्क, बिल्डिंग नं. एफ-१, चिंचवड, पुणे), पार्थ महेश मोहिते (वय २५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), साई दिपक मोहिते (वय २३, रा. प्रगतीनगर, पांचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेश रघुनाथ शिंदे (रा. जयसिंगपूर जि. कोल्हापूर सध्या रा. घाटकोपर, मुंबई), अक्षय लोहार (रा. संकेश्वर जि. बेळगाव, राज्य कर्नाटक), शकील पटेल (रा. गडहिंग्लज जि. कोल्हापूर), आदित्य मोरे (रा. रुकडी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अन्य संशयितांची नावे आहेत.
रविवार दि. १४ रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास कवठेमहांकाळ येथे डॉ. म्हेत्रे यांच्या घरी अनोळखी ३ पुरुष व १ महिला यांनी इनकम टॅक्स ऑफीस, मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करुन त्यांच्याकडील १,४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे व १५.६० लाखांची रोकड फसवणूक करुन घेऊन गेल्याने त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा गंभीर असल्याने कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना देवून गुन्हयाबाबत सविस्तर माहिती घेऊन वेगवेगळी पथके तयार करुन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर गुन्हयातील संशयीत महिला ही पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे येथे जाऊन दिक्षा भोसले हिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर तिने इतर साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केला असल्याचे कबूल करुन तिचे इतर साथीदारांचे ठावठिकाण्याबाबत उपयुक्त माहिती दिली.
तात्काळ महिलेने दिलेल्या माहिती प्रमाणे इतर आरोपीचा शोध घेणेसाठी वेगवेगळी पथके रवाना करुन त्यांचा शोध घेत असताना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पार्थ मोहिते व साई मोहिते यांना सापळा रचून हातकणंगले येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हयाची कबूली देऊन त्यांचेकडे असलेली बॅग तपासली असता त्यामध्ये एकूण १,४१० ग्रॅम वजनाचे दागिने, बिस्किटे तसेच १५.०५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील, एलसीबीचे सहायक निरीक्षक पंकज पवार, सहायक निरीक्षक नितीन सावंत, सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी, सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, उप-निरीक्षक तेजश्री पवार, उप-निरीक्षक विनायक मासाळ, एलसिबिकडील स्वप्ना गराडे, सागर लवटे, नागेश खरात, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, सतिश माने, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, अमर नरळे, आमसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, इम्रान मुल्ला, अतुल माने, केरूबा चव्हाण, विक्रम खोत, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडील नागेश मासाळ, सिध्दराम कुंभार, अभिजीत कासार, शितल जाधव, स्वप्निल पाटील, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील, अजय पाटील, अजय बेंद्रे, शांता कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.