Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परिवहन मंत्र्यांनी विकत घेतली देशातील पहिली टेस्ला कार!

परिवहन मंत्र्यांनी विकत घेतली देशातील पहिली टेस्ला कार!

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी केली आहे. सरनाईक यांनी मुंबईतील बीकेसी येथील टेस्ला शोरुममधून ही इलेक्ट्रिक कार विकत घेतली. यावेळी त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक हे देखील उपस्थित होते.

टेस्लाचे 'मॉडेल वाय' (Tesla Model Y) खरेदी करताना कोणतीही सवलत न घेता संपूर्ण किंमत भरल्याचे स्पष्ट केले. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीला चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

मंत्री सरनाईक यांनी यावेळी म्हटलं की, आम्ही तुम्हाला उद्घाटन करताना सांगितले होते की, आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य देतोय. टेस्लासारखी गाडी चांगली आहे, पूर्ण पैसे भरून आणि कोणत्याही सवलतीशिवाय मी ही गाडी घेतली आहे. मी आनंदी आहे की राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरण पुरक गाडी घेतली आहे. पुढील १० वर्षात जास्तीत जास्त गाड्या या यायलाच हव्यात. पर्यावरण पुरक गाड्या जास्तीत जास्त येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचेही पर्यावरण पुरक गाड्या येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या गाड्यांना सर्व टोल नाक्यांवरही पर्यावरण पुरक गाड्यांना सूट दिली आहे. या कंपन्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

टेस्ला 'मॉडेल वाय' ही एक आलिशान आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. भारतात याची अंदाजित किंमत 70 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. हे मॉडेल अवघ्या 3.5 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास चा वेग पकडू शकते. बॅटरी रेंजबाबत सांगायचं तर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हे मॉडेल सुमारे 514 किलोमीटरपर्यंत (km) प्रवास करू शकते.

कारच्या आत एक मोठी 15-इंच टचस्क्रीन आहे, ज्यावर सर्व कंट्रोल उपलब्ध आहेत. यात पारंपरिक डॅशबोर्ड किंवा बटणे नाहीत, ज्यामुळे इंटीरियर अतिशय आधुनिक दिसते. यात ऑटोपायलट सारखे प्रगत तंत्रज्ञान आहे, जे सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञान गाडीला आपोआप लेनमध्ये ठेवते, वेग नियंत्रित करते आणि इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर राखण्यास मदत करते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.